सोयाबीन पिकांवरील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

सोयाबीन पिकांवरील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

        चंद्रपूर दि. 24 ऑगस्ट: सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. यामध्ये पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, चक्री भुंगेरे इत्यादी प्रामुख्याने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यावर उपाय म्हणुन शेतकरी बाधंवानी सोयाबीन पिकावर अळया खाणाऱ्या पक्ष्यांना थांबण्यासाठी सोयाबीन शेतात विविध ठिकाणी   टी (T) आकाराचे पक्षी थांबे उभारावे. ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर स्पोडोप्टेरा किंवा पाने खाणाऱ्या अळयांचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या निरीक्षणासाठी हेक्टरी आठ कामगंध सापळे लावावेत व नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा प्रोफेनोफोस 50 टक्के ईसी 20 मि.ली. प्रति  10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

                सोयाबीन पिकावर खोडमाशी आढळल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी इंडोक्झीकार्ब 15.8 टक्के एस.सी. 7 मिली किंवा क्लोराट्रोनिप्रोल 18.5 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे पानावरील जीवाणू व बुरशीजन्य ठिपके आढळल्यास टेबूकोनाझोल 10 टक्के डब्लू.पी.+ सल्फर 65 टक्के डब्लू.जी. 25 ग्रम 10 लिटर पाण्यातून फवारावे.

                शेतकरी बंधूनी सोयाबीन पिकांवरील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.