माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनपा तर्फे सद्भावना दिन साजरा

भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सद्भावना दिन साजरा करण्यात येतो. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये सद्भावना दिन साजरा करण्यात आला. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, उपायुक्त अशोक गराटे यांनी सद्भावना दिनानिमित्त अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली.