पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा हस्ते ध्वजारोहण

पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा हस्ते ध्वजारोहण

भंडारा, दि.14:- 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या 74 वा वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. कोविड प्रोटोकॉल पाळून हा कार्यक्रम साजरा होणार आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य आहे.

 पालकमंत्री यांचा भंडारा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय भंडाराकडे प्रयाण. सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 74 वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.10 वाजता भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिनानिमित्त मनोगत. सकाळी 9.20 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव. सकाळी 10.10 वाजता विश्रामगृह भंडारा येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.