भंडारा :   9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमीत्त व्याख्यानाचे आयोजन शासनाच्या योजनांच्या माध्यमातून विकास आदिवासींचा वेध भविष्याचा

  9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमीत्त व्याख्यानाचे आयोजन

शासनाच्या योजनांच्या माध्यमातून विकास आदिवासींचा वेध भविष्याचा

भंडारा,दि.8 : 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमीत्ताने आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रविंद्र ठाकरे यांचे मागदर्शनाखाली आदिवासी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या दृष्टीकोनातून शासनाच्या माध्यमातून विकास आदिवासींचा, वेध भविष्याचा या विषयावर प्रमुख वक्ते माजी प्राध्यापक डॉ.भाष्कर हलामी, लक्षमणराव इन्स्टीट्यूट ट्रेनिंग नागपूर संस्था संशोधक डॉ.शामरराव कोरोटे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे प्राध्यापक इतिहास विभाग प्रमुख, जवाहर नेहरु विद्यापीठ दिल्लीचे डॉ.केशव वाळके, मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालय नागपूरचे प्राध्यापक प्रविण मोटे व लोकांचे सामुहिक केंद्र नागपूरचे संचालक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

       सदर व्याख्यान You Tube च्या माध्यमातून 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता https://www.youtube.com/watch?=qydlK9m7ytk या लिंकद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. तरी सदर व्याख्यानाचा आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.