चंद्रपूर : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

सिंदेवाही

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख ना.उद्धवजी ठाकरे यांचे आज मंगळवार २७ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व महापूर आणि दरड कोसळल्याने संकट निर्माण झाले असून वाढदिवस धामधुडाक्यात साजरा न करता साधेपणाने व संकटसमयी लोकांच्या मदतीसाठी उपक्रम राबविण्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी आवाहन केल्याने चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून सिंदेवाही तालुक्यात शिववाहतुक सेना कामगार सेनेच्या वतीने कोरोणा विषयी लोकांना जनजागृती करण्यात आले व माक्स चे वितरण करण्यात आले ग्रामीण रुग्णालय रूग्नांना पळवाट व पोष्टिक आहार वितरण करण्यात आले याप्रसंगी तालुका अध्यक्ष अमान पटेल, तालुका उपाध्यक्ष राहुलसिंग महादेवसिंग ठाकुर, शहर अध्यक्ष नवाब शेख , शहर उपाध्यक्ष अंकुश सिडाम व साहील गायकवाड , वैभव येवनकर , शुभम नागोसे , अक्षय बोरकुंडावार , वैभव चौके व शिवसैनिक उपस्थित होते.