गडचिरोली : शिवसैनिकानी कोविड १९ या टीका लसीकरण मोहीम हाती घेऊन त्याविषयी जनजागृती करावी – रियाजभाई शेख

शिवसैनिकानी कोविड १९ या टीका लसीकरण मोहीम हाती घेऊन त्याविषयी जनजागृती करावी – रियाजभाई शेख

शिव संपर्क अभियान कार्यक्रमात अनेकांचा पक्षप्रवेश

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा )

सिरोंचा :- सिरोंचा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृह येथे शिव संपर्क अभियान मोहीम नगर पंचायत निहाय बैठक घेण्यात आले. या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख, रियाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव संपर्क मोहीम अंतर्गत जिल्हा प्रमुख यांनी नगर पंचायत सिरोंचा,१७ प्रभागात वार्ड प्रमुख, बूथ प्रमुख, बी एल. ए. शहर प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी पद नियुक्ती करून, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश करून घेतले. आणि गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक अभियान राबवून लोकांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील कार्य करण्यासाठी आव्हान केले. तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकानी कोविड १९ या महामारी मध्ये शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, टीका लसीकरण मोहीम हाती घेऊन याचा प्रसार प्रसार करावे असेही जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी आपल्या संभाषणात सांगितले काही महिन्यातच नगर पंचायत निवडणूक येत असून आपण प्रभाग वाहिज लोक हिताचे कार्य करावे, आणि प्रत्येक प्रभागात शिव संपर्क अभियान अंतर्गत लोकांचे समस्या जाणून घेऊन प्रश्न सोडवावे. असे आव्हान जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी मत व्यक्त केले.

या बैठकीत विविध विषयावर चर्चा करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी कार्य करावे म्हणून बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने सिरोंचा तालुका प्रमुख, अमित भाऊ तिपत्तीवार, तालुका संघटक, दुर्गेश तोक्ला, अल्प संख्यक, तालुका प्रमुख, रफिक कुरेशी, उप तालुका प्रमुख, चंदू बत्तुला, शहर प्रमुख, तुषार येंडे, अल्प संख्यांक शहर प्रमुख, युसुफ शेख, मुशर्रफ खान, इरफान शेख, शैलेंद्र चांगरापु, अब्दुल तलिफ, साई आईला, जयंत पोलंपल्ली, जितेंद्र मोरे, वेणू कोटावढला, शंतोश पेराला, राहुल बात्तुला, हेमंत लातकरी, सत्यनारायण दासर्ती, विनोद हिंबडी, सय्यद सलीम, किरण रिक्कुला, रमेश सापलवार, यावेळी सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित राहून शिव संपर्क अभियान मोहीम यशस्वी पाडण्यासाठी सूत्र हाती घेतले.