चंद्रपूर : कौशल्य विकास विभागातर्फे आज ऑनलाईन मार्गदर्शन

कौशल्य विकास विभागातर्फे आज ऑनलाईन मार्गदर्शन

चंद्रपूर दि. 14 जुलै : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूरद्वारे 15 जुलै 2021 रोजी ऑनलाईन मागदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या अंतर्गत्‍ अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमरीन पठाण, महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक लोमेश भोयर, संत रोहिदास चर्मोद्योग व  चर्मकार विकास महामंडळाच्या विजयालक्ष्मी भगत आणि उद्योमिता प्रकल्पाच्या जिल्हा समन्वयक मृणाली पिंपळकर हे आपापल्या महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 15 जुलै रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व उमेदवारांनी स्वत:च्या मोबाईलवर गुगल मीट हे ॲप डाऊनलोड करावे आणि meet.google.com/rqc-kmpr-xxi या लिंकवर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता 07172 – 252295 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हाधिका-यांच्या हस्ते व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचा सत्कार : मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग घेणा-या वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर येथे दुपारी 1 वाजता सन्मान करण्यात येईल.