भंडारा : कोरोणा ; जिल्ह्यात आज 02 रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात आज 02 रुग्णांना डिस्चार्ज

  • कोरोना पॉझिटिव्ह02
  • बरे झालेले रुग्ण58661
  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण59797
  • क्रियाशील रुग्ण06
  • आज00 मृत्यू
  • एकूण मृत्यू1130
  • रिकव्हरी रेट98.10 टक्के
  • मृत्यू दर01.89
  • आजच्या टेस्ट825

भंडारा, दि.14:- जिल्ह्यात आज 02 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58661 झाली असून आज 02 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59797 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे.

आज 825 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 02 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 04 लाख 25 हजार 876 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59797 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 02 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58661 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59797 झाली असून 06 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1130 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोविडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे,मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
  • साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी20 सेकंद व्यवस्थित धुवा.
  • साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.