भंडारा : जिल्ह्यातील चार तालुके कोरोनामुक्त

भंडारा जिल्ह्यातील चार तालुके कोरोनामुक्त

  • सलग चौथ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्ण शून्य
  • क्रियाशील रुग्ण केवळ सहा
  • रिकव्हरी रेट 98.10 टक्के
  • आजच्या टेस्ट 910

भंडारा, दि.13:- जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या शून्य निघाली असून भंडारा, मोहाडी, तुमसर व लाखांदूर तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर 98.10 एवढा झाला आहे. आज 910 व्यक्तींची चाचणी केली असता एकही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रेट शून्य असून आता केवळ 06 सक्रिय रुग्ण आहेत.

आज 01 रुग्ण बरा होऊन घरी गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58659 झाली असून आज एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59795 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 25 हजार 51 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 59795 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58659 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59795 झाली असून 06 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1130 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.90 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

टिप:- माहे एप्रिल 2021 व मे 2021 पासून कोविड पोर्टलवर कोविड रुग्णांची माहिती Synchronized झाल्यामुळे जिल्ह्याची कोविड रुग्ण संख्या 303 ने वाढली आहे. तसेच सर्व रुग्ण बरे सुध्दा झालेले आहेत, तरी त्यांचा समावेश एकूण रुग्ण संख्येत व एकूण डिस्चार्ज मध्ये करण्यात आला आहे.