अहेरी येथिल जन आक्रोश आंदोलनात शिवसेनाही आक्रमक.

अहेरी येथिल जन आक्रोश आंदोलनात शिवसेनाही आक्रमक.

बातमी संकलन – सदाशिव माकडे
संपर्क : ८२७५२२८०२०
०६९ अहेरी (गडचिरोली) : केंद्रातिल सरकार इंधन गॅस, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढ करीत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रविवार ४ जुलै रोजी अहेरी शहरातील मुख्य चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाला शिवसेना पक्षाने पाठींबा दर्शवून शिवसेना सुद्धा आक्रमक बनली आहे.
यावेळी शिवसेनेचे अहेरी विधानसभेचे जिल्हा प्रमुख रियाज भाई शेख यांनी, जनआक्रोश आंदोलनात सहभागी होऊन केंद्र व मोदी सरकारवर तीव्र शब्दात निषेध करीत चीड व संताप व्यक्त केले. आणि केंद्र सरकारने आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ भाववाढ कमी करण्याची मागणी आदोलनात करण्यात आली. एकंदरीत गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच केंद्रशासनाशी निगडित तत्सम जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे केंद्र सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. ह्या भावाढीमुळे गोरगरीब व सर्वसामान्य लोकांचे हाल होत असून अगोदरच कोरोनामुळे लाकडाऊन स्थितीतील विस्कळीत झालेले अर्थचक्र पूर्वस्थितीत येण्या ऐवजी ते ह्या महागाईमुळे पुन्हा विस्कळीत होत आहे, याला जबाबदार कोण असणार.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शिवसेनेचे अहेरी विधानसभा प्रमुख रियाजभाई शेख, उपजिल्हाप्रमुख अरुणभाऊ धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, दिलीप सुरपाम, प्रफुल्ल येरणे व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 

अगोदरच सर्वसामान्य गोरगरीब जनता कोरोना काळातील लाकडाऊनमुळे आर्थिक दृष्टीने हवालदील झालेले असून बऱ्याच लोकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर काहीचे रोजगार हिरावल्या गेलेत अशा स्थितीत गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली भाव वाढ ही जनतेच्या जीवाशी केल्या जात असलेली खिलवाड म्हणावं की काय? अशी स्थिती निर्माण झालेली असून सदर भाववाढ तात्काळ कमी न केल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा ईशारा शिवसेना विधानसभा प्रमुख रियाजभाई शेख यांनी आंदोलन स्थळी दिलेला आहे.