अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई
एकुण ०८ जनावर (बैल) गौवंशाची सुटका
एक पिकअप वाहनासह एकुण ६,६०,०००/- रुपयाचा माल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक २६ डिसेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलीस स्टेशन मुल हद्दीत नांदगांव येथे नाकाबंदी करुन एक पिकअप वाहन क्रमांक एम.एच.३४-बीझेड-९१५२ ला वाहनातील इसम नामे (१) स्वप्नील प्रल्हाद कुळमेथे वय ३२ वर्ष चालक, रा. येरगांव ता. पोंभुर्णा (२) विजय खुशाल बट्टे वय २७ वर्ष रा. घडोली ता. गोंडपिपरी यांना ताब्यात घेवुन पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात एकुण ०८ नग गोवंशीय जनावरे (बैल) कत्तली करीता अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक ६१९/२०२५ कलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० व कलम ५ (अ), ९,११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ३(५), ४९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपीचे ताब्यात एकुण ०८ नग जनावरे आणि पिकअप वाहन असा एकुण ६,६०,०००/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, पोहवा सुरेंद्र महतो व चापोअं गजानन मडावी यांनी केली आहे.









