चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ मध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस संघ ठरला जनरल चॅम्पियन”

दिनांक ५/१२/२०२५ ते ९/१२/२०२५ पावेतो भंडारा जिल्हयातील पोलीस मैदानावर आयोजित नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ चा समारोप मंगळवार दिनांक ०९ डिसेंबर, २०२५ रोजी मोठया उत्साहात पार पडला.

भंडारा जिल्हयात आयोजित या नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ मध्ये नागपूर (ग्रामीण), भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्हयातील प्रत्येकी १४० खेळाडु अश्या एकुण ८४० खेळाडु पोलीसांनी सहभाग घेतला असुन सदर स्पर्धे मध्येच्या सांघिक क्रीडा प्रकारातील हॉकी, फुटबॉल, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो मध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाने प्रथम व द्वितीय तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारातील वेटलिफ्टिंग, बॉक्सींग, कुस्ती, ओशो-तायकोंडो, पावर लिफ्टिंग प्रथम स्थान प्राप्त करुन “जनरल चॅम्पियनशिप” चा मानकरी ठरला.

चंद्रपूर जिल्हा पोलीस संघ सन २०१६ पासुन सात्तयाने परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत यावर्षी ११ व्या वेळी जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी ठरत चंद्रपूर जिल्हयाचे नांव लौकिक करीत आहे.

नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५ चे समापन कार्यक्रमात श्री संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र नागपूर, श्री अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र यांच्यासह श्री हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री नुरुल हसन, पोलीस अधीक्षक भंडारा, श्री निलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री गोरख भांबरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जनरल चॅम्पियनशिपची घोषणा झाली तेंव्हा मैदानावरील उपस्थित खेळाडुंनी जोरदार टाळया वाजवुन चंद्रपूर जिल्हा पोलीस संघाचे कौतुक केले.स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त माहितीचे आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधरे ऑपरेशन शोध-२ या विशेष मोहिम अंतर्गत पोलीस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी नागपूर ग्रामीण हद्दीत जावुन पोलीस स्टेशन गडचांदुर येथील अपराध क्रमांक २८५/२०२२ कलम ३६३, ३७० भादंवि मधील घरुन निघुन गेलेल्या व मागील ३ वर्षापासुन बेपत्ता असलेली मुलीचा शोध घेवुन तिला पोलीस स्टेशन गडचांदुर चे स्वाधिन करण्यात आले आहे.

सदरची कारवाई श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंदपुर यांचे नेतृत्वात पोउपनि श्री संतोष निभोरकर, पोउपनि श्री सुनिल गौरकार, पोअं. सुमीत बरडे, अजित शेंडे, मपोअं. छाया निकोडे व चापोहवा गजानन मडावी, मानव तस्करी विरोधी कक्ष चंद्रपूर आणि साबयर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी केली आहे.