सिंदेवाहीत ‘वंदे मातरम’ चा सूर लावून भारत भुमिचा गौरव केला
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकणारे, जनतेला एकत्र आणणारे आणि क्रांतीची चेतना जागवणारे अमर राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून सिंदेवाहीत शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्वोदय महाविद्यालयाच्या प्रांगणात सार्धशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सिंदेवाहीच्या वतीने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारून गेला.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ‘वंदे मातरम्’ चे सामूहिक गायन ठरले. हजारोंच्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांनी एकाच सूरात व एकाच लयीत राष्ट्रगीताचा जयघोष करताच सर्वोदय महाविद्यालयापासून संपूर्ण तालुका देशाभिमानाने दुमदुमून गेला.
या महोत्सवाला प्राचार्य सुशील कुंजलवार (सर्वोदय महाविद्यालय), सिंदेवाही तहसीलदार सागर वाहणे, गटविस्तार अधिकारी आत्मज मोरे, गट निदेशक डी. लक्कावार, तसेच उत्कृष्ट प्रवक्ते आल्हाद दिलीपराव शिनखेडे (ब्रम्हपुरी), कांचन पांडे, अंजली सायंकार, विनोद सुरपाम, प्राचार्य अतुल केकरे, संदीप बांगडे, धनंजय मोगरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष उर्जा दिली. मान्यवरांनी आपल्या भाषणातून वंदे मातरम् गीताचे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व उलगडत तरुणांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान ITI विद्यार्थ्यांकडून रांगोळी, चित्रकला, वकृत्व, गीतगायन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे उत्तम संचालन पी. गोटे यांनी केले, तर अश्विनी घडसे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाकरिता माळी सर कुरसुंगे सर,आकडे सर, शास्त्रकार ,बिसेन सर, रंधई सर, नंदनवार सर कु. भल्लवी मॅडम, कु. देठे मॅडम, कु. सहारे पाकमोडे,किरसान सर, राऊत सर, सातपूते , याचे सहकार्य लाभले. कोहळे सर, हडपे मॅडम, पाहुनकर यांचे उपस्थितीत सांगता राष्ट्रगिताने झाली. ITI सिंदेवाहीतील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येत ‘वंदे मातरम्’ चा जोरदार जयघोष केला. राष्ट्रगीताच्या १५० वर्षांचा हा ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि स्मरणीय सोहळा सिंदेवाहीकरांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाणार आहे.








