विदर्भ तेली समाज विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पदी प्रतीक हरणे

विदर्भ तेली समाज विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पदी प्रतीक हरणे

कोजागिरी कार्यक्रमात गुणवंतांचा सत्कार व नियुक्ती

सिंदेवाही : श्री संत संताजी महिला संघटना, सिंदेवाही यांच्या वतीने शरद पौर्णिमा निमित्त कोजागिरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील SET परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थी प्रतीक पुष्पा प्रेमकुमार हरणे याचा सत्कार करून त्याची विदर्भ तेली समाज विद्यार्थी महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाला विदर्भ तेली समाज केंद्रीय सदस्य माधव वरभे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी राम सेलोकर, ध्यान संवर्धन संस्था मोहाळीचे सचिव प्रेमकुमार हरणे, जिल्हा सचिव भूपेश लाखे, तसेच डॉ. पद्मजा वरभे, आशा गंडाते, अल्का कावळे, आणि पुष्पा हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांच्या आदेशावरून प्रतीक हरणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. समाजाच्या आशीर्वादाने आणि गुरुजनांच्या संस्कारातून संताजी जगनाडे महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार प्रतीक हरणे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप बासुंदीचा आस्वाद घेत करण्यात आला.