सिंदेवाहितील कृतिका दिलीप बल्लेवारची तायक्वांडो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड

सिंदेवाहितील कृतिका दिलीप बल्लेवारची तायक्वांडो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड

चंद्रपूर जिलह्यातील सिंदेवाही शहरातील कृतीका दिलीप बल्लेवार या विद्यार्थिनीने दिनांक 4 आणि 5 ऑक्टोबर 2025 रोजी बिलासपूर (छतीसगढ) येथिल बहतारी स्टेडियमवर झालेल्या तायक्वांडो स्पर्धेत कास्य पदक पटकाविले आहे. सदर स्पर्धेत 20 राज्यातील एकूण 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता यात कृतिकाने आपला उत्कृष्ठ खेळ दाखवत अखेर ती कास्य पदकाची मानकरी ठरली आहे. तिची निवड नोव्हेंबर महिन्यात भूतान येथे होणाऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी झाली असून ही सिंदेवाही तालुक्यातील पहिली तायक्वांडो खेडाळू ठरली आहे. कृत्तिका ही सिंदेवहितील डी.के. तायक्वांडो असोसियेशन येथिल विध्यार्थीन आहे. कृतीकाने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा तायक्वांडो सचिव सतिश खेमस्कर, सिंदेवाही तालुका तायक्वांडो अध्यक्ष अरविंद जैस्वाल, सर्वोदय महाविद्यालयाचे अध्यक्ष योगेंद्रजी जैस्वाल, डॉ.एल.बी.नागलवाडे, विनय खोब्रागडे यांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील स्पर्धेकरिता शुभेछ्या दिल्या. कृतीकाने आपल्या सदर यशाचे श्रेय तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आकाश बागलावे, अल्फिया शेख, आणि आपल्या आई वडिलांना दिले.