१४ गौवंशीय जनावरांची सुटका, ९,३६,०००/- रु चा मुद्देमाल जप्त

उप पोलीस स्टेशन धाबा हद्दीत गौवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडुन

१४ गौवंशीय जनावरांची सुटका, ९,३६,०००/- रु चा मुद्देमाल जप्त

उप पोलीस स्टेशन धाबा ची कामगिरी

दिनांक २६ ऑगस्ट, २०२५ रोजी धाबा पोलीसांनी धाबा मार्गे तेलगंना येथे कत्तलीसाठी वाहना मधुन अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याबाबत मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन सदर मार्गावर सापळा रचुन नाकाबंदी केली असता एक पिकअप वाहन येत असतांना दिसल्याने त्यास थांबवून पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकुण १४ गोवंशीय जनावरे दोरीने बांधुन कत्तीकरीता घेऊन जात असतांना मिळुन आल्याने सदर वाहनातील वाहन चालक व इतर एक यांचेविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करुन त्याच्याकडुन एक महिन्द्रा पिकअप वाहन TS20T4967 आणि १४ गोवंशीय जनावरे व २ नग मोबाईल असा एकुण ९,३६,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास धाबा पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा श्री सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनात उप पो.स्टे. धाबा ठाणेदार सपोनि श्री धर्मेंद्र मडावी यांचे नेतृत्वात पोअं. श्रावण कुत्तरमारे, गजानन तुरेकर, अमोल देठे, चंद्रशेखर आसुटकर यांनी केली आहे.