शिव प्रतिष्ठान मित्र परिवार सिंदेवाही तर्फे त्या अपघातातील गंभीर जखमिंना आर्थिक मदत
सिंदेवाही तालुक्यातील मुरमाळी तलावावर गणपती विसर्जन करून परत येतांना ०६/०९/२५ ला रात्री गणेश भक्तांचा टाटा एस ने भिषन अपघात झाला होता. अपघात १६ पेक्षा जास्त लोकांना गंभिर दुखापत झाली होती, त्यापैकी ७ लोकांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते, मात्र त्यापैकी एकाची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी नागपूर येथे हलविण्यासाठी सुचना दिली, वेळ कमी असल्याने नातलगांनी चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलेत, ०६/०९/२५ ला झालेल्या अपघातानंतर आज ५ दिवसांनंतरही कु. पियूश प्रमोद मस्के यांनी डोळे उघडले नसुन प्रकृती सध्या स्थितीत चिंताजनक असुन वेंटीलेटर वर आहे, घरच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपरेशन व इतर खर्चासाठी गावातील मित्र,नातलग, शेजारी व इतर दानदात्यांनी आर्थिक मदत करीत आहेत, या संदर्भात शिव प्रतिष्ठान मित्र परिवार सिंदेवाही यांना माहीती होताचं कु.पियूश प्रमोद मस्के यांचे घरी जाऊन बंद लिफाफ्यात ५१००/- पाच हजार शंभर रुपयाची मदत केली आहे तसेच कु. मिलिंद दत्तु चावरे यांचे छातीचे हाळे तुटली होती घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे व त्याचे वडील स्वर्गवासी झाले आहेत, त्यामुळे मिलींदला आयुर्वेदिक उपचारासाठी ठानेगाव येथे नेण्यात आले होते, मात्र मिलींदला दुखापत छातीत असल्याने गडचिरोली येथील दवाखान्यात उपचार करण्यासाठी सल्ला देण्यात आले, त्यामुळे गडचिरोली येथे सध्या मिलींद वर उपचार सुरू आहे. परिस्थितीची दखल घेत शिव प्रतिष्ठान मित्र परिवार तर्फे कु. मिलिंद दत्तु चावरे यांचे परिवारास सुद्धा ५१००/- पाच हजार शंभर रुपयाची आर्थिक मदत केली आहे, विषेश व आश्चर्य म्हणजे आर्थिक मदत करतांना फोटो काढण्यास शिव प्रतिष्ठान मित्र परिवाराने विरोध केला आहे, हि बाब कौतुकास्पद आहे.
काही स्वयंघोषित लिडर प्रसिध्दी मिळविण्यासाठी फक्त मृत व्यक्तीच्या परिवारास आर्थिक मदत करुन त्या असहाय्य, गरिब, लाचार, परिवारातील सदस्यांना समोर करुन लिफाफा देतांना दहा पंधरा हॉप लिडर बाजुला उभे राहून फोटो काढून विविध वृत पत्रात बातमी प्रकाशित करून सोशल मीडियावर लाखों रुपये दिल्यासारखे जोरदार प्रचार करतात, बातमी ची हेडींग असते मृत परिवारास आर्थिक मदत. परंतु दिलेली रक्कम किती असते हे कधीही लिहलेली नसते, कारण त्यांना बहुतेक लाज वाटत असेल? दिलेली रक्कम असते पाच हजाराची आणि प्रचार असते पाच लाखां सारखा… वारे नेत्यांनो जिवंत वेळेस ज्यांना आर्थिक मदतीची गरज असते तेव्हा तुम्ही समोर येत नाही आणि एखादा व्यक्ती मेल्यानंतर मृतकाचे घरी जाऊन सांत्वन करून फोटो काढून मोठी प्रसिद्धी करता वा…बहुतेक यालाचं म्हणायचं राजकारण? फक्त जाती, धर्माच्या नावावर राजकारण करून प्रसिद्धी मिळवायला पाहिजे काही स्वयंघोषित लिडरांना ?
०६/०९/२५ ला रात्री झालेल्या दुर्दैव गंभीर अपघात टाटा एस चालकाच्या चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघाताच्या वेळेस टाटा एस गाडी चालविणारा ड्रायव्हर दुसरा होता व अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर म्हणून दुसरा होता, अशी चर्चा आता समोर येत आहे. काय खरं आहे ते पोलीसांच्या तपासणी नंतरचं कळेल.