चोरीतील दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल हस्तगत // शहरात पोलिस स्टेशन चंद्रपूर ची कार्यवाही  

चोरीतील दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल हस्तगत 

शहरात पोलिस स्टेशन चंद्रपूर ची कार्यवाही 

पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक १५.०८.२०२५ रोजी प्रांतीक कॉलनी भिवापुर वार्ड येथील रहिवासी महिला यांनी पोस्टे चंद्रपुर शहर ला येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, ते बाहेरगावी आपले नातेवाईकांकडे दिनांक ११.०८.२०२५ रोजी गेले होती. आणि दिनांक १४.०८.२०२५ रोजी सायंकाळी आपले घरी परत आले असता, त्यांचे घराचे कुलूप तुटून असुन त्यांचे घरात चोरी झाल्याचे समजुन आल्याने त्यांना लागलीच पोस्टे चंद्रपुर शहर येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिल्याने पोस्टे चंद्रपुर शहर येथे कलम ३३१(३), ३३१ (४),३०५ बी.एन.एस. प्रमाणे घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरचा गुन्हा नोंद होताच चंद्रपुर शहर पोलीसांनी तपासचक्रे फिरवुन, गोपनीय माहिती संकलीत करून आणि तपास कौशल्याचा वापर करून गुन्हा दाखल होताच काही कालावधीत आरोपींचा शोध घेण्यात आला. सदर आरोपीतांचा मा. विद्यमान न्यायालयातुन पोलीस कोठडी रिमांड घेवुन आरोपी १) सुमित शांताराम अम्राजवार, वय २८ वर्षे, २) तनविर कदीर बेग, वय २३ वर्षे, दोन्ही रा. भंगाराम वार्ड चंद्रपुर यांची कसुन चौकशी केली असता, आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल ३२.७३० मीली.ग्रॅ. एकुण किं. २०,६१,७६/- रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच दिनांक १६.०८.२०२५ रोजी फिर्यादी नामे नारायण चिल्लकेवार रा. भिवापुर वार्ड चंद्रपुर यांची मोटारसायकल चोरी झाल्याबाबत त्यांनी पोस्टेला येवुन तकार दिल्याने सदर गुन्हयाबाबतसुध्दा अटक आरोपीतांची कसुन चौकशी केली असता, वरील आरोपीतांनीच मोटारसायकल क. एम.एच. ३४ ए.झेड. २०५३ किं. २०,०००/- रू. चोरी केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्हयात सुध्दा त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदरचे दोन्ही गुन्हे चंद्रपुर शहर पोलीसांनी काही वेळातच उघडकीस आणलेले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, मा. प्रभारी उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. निशीकांत रामटेके चंद्रपुर शहर यांचे नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि. दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पो.हवा. सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, म.पो.हवा. भावना रामटेके, निकेश ढेंगे, नापोशि. कपुरचंद खरवार, पोअं जावेद सिध्दीकी, योगेश पिदुरकर, रूपेश पराते, विक्रम मेश्राम, सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे.