चंद्रपूर शहर येथील घरफोडीचा गुन्हा अवध्या काही वेळातच उघड // चोरीतील सोन्याचे दागीने फिर्यादीस सुर्पूद
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी
दिनांक ३० एप्रिल, २०२५ रोजी तक्रारदार विभा प्रशांत क्षिरसागर रा. भावसार चौक घुटकाळा वार्ड चंद्रपुर यांनी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे रिपोर्ट दिली होती की, त्यांचे राहते घरी कोणीतरी अज्ञात इसमांनी प्रवेश करून त्यांचे घरातुन सोन्याचे दागीने एकुण किंमत १,४७,४३२/-रू. चा मुद्देमाल चोरून नेला अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अज्ञात आरोपीविरुध्द अपराध क्रमांक: २८५/२०२५ कलम ३०३ (५), ३३१(३), ३१७(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून तपासात केला असता चंद्रपुर शहर पोलीसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवुन काही वेळातच आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयातील गेलेला संपुर्ण माल आरोपीकडुन हस्तगत केला.
सदर गुन्हयातील मुद्देमाल पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे मुद्देमाल कक्षात जमा असल्याने तक्रारदार यांनी मा. विद्यमान कोर्टातुन सुपूतनामा ऑर्डर आणल्याने त्यांना सदर गुन्हयातील जप्त असलेला मुद्देमाल (१) एक सोन्याचे लॉकेट ओम चिन्ह असलेले, (२) दोन नग सोन्याचे गोप, (३) दोन नग सोन्याच्या अंगठ्या, (४) एक नग सोन्याची पोत (मंगळसुत्र काळयामणीसह) असा एकुण १,४७,४३२/-रू. चा किंमती मुद्देमाल तक्रारदार विभा प्रशांत क्षिरसागर रा. भावसार चौक घुटकाळा वार्ड चंद्रपुर यांना सुपूर्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. चंद्रपूर शहर चे पोलीस निरीक्षक श्री निशीकांत रामटेके यांचे नेतृत्वात मपोहवा निता भगत, पोअं शिवाजी गोरे यांनी पार पाडली.
संपुर्ण मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंदाने फिर्यादीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलीसांचे चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा समाधान झाल्याने परिसरातील नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.