जिल्हयातील तीन घरफोडीचे गुन्हे आणि एक मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड… २ आरोपी अटक १,९३,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

जिल्हयातील तीन घरफोडीचे गुन्हे आणि एक मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड… २ आरोपी अटक १,९३,४००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कामगिरी

दिनांक ५ जुलै, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक जिल्हयात गुन्हेगार शोध मोहीम व पेट्रोलींग करीत असतांना रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे (१) अतुल उर्फ मुजोर विकास राणा वय २६ वर्ष रा. भगतसिंग वार्ड बंगाली कॅम्प चंद्रपूर आणि (२) ऋषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम वय २४ वर्ष रा. विसापूर यांनी बल्लारपूर पोस्टे हद्दीत घरफोडी केल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने सदर दोन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी पोस्टे बल्लारपूर व रामनगर हद्दीत घरफोडीचे तीन गुन्हे आणि राजुरा हद्दीत एक मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या कडुन चोरीच्या गुन्हयातील खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पो.स्टे. बल्लारपूर अप.क्र.४६३/२०२५ कलम ३०५ (ए), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता मधील सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची एक चैन, सोन्याची दोन आंगठी, चोरीस गेलेला रेडमी कंपनीचा मोबाईल, रोख ४००/- असा एकुण १५३,४००/- रुपयाचा मुद्देमाल

पो.स्टे.राजुरा अप.क्र. ३११/२०२५ कलम कलम ३०३), ३३१ (४) भारतीय संहिता मधील एक होंडा शाईन मोटार न्याय क्र. MH34X5159 किं.४०,०००/- रु.

पो.स्टे. रामनगर अप.क्र. ४८४/२०२५ आणि ५७०/२०२४ कलम ३०५ (ए), ३३१(३) भारतीय न्याय संहिता

असा एकुण १,९३,४००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात येवुन आरोपींना बल्लारपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कांक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंबोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा जयसिंह, गणेश मोहुर्ले, नापोअं संतोष येलपुलवार, पोअं नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.