दुचाकी मोटार सायकल चोरी करणारे दोन आरोपी अटक ४ वाहने किंमत ३,७०,०००/- रु. ची जप्त पोलीस स्टेशन राजुरा ची कारवाई

दुचाकी मोटार सायकल चोरी करणारे दोन आरोपी अटक ४ वाहने किंमत ३,७०,०००/- रु. ची जप्त पोलीस स्टेशन राजुरा ची कारवाई

दिनांक २६ मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत दोन इसम काळया रंगाची कलर केलेली बिना नंबरची गाडी घेवुन विकण्याकरीता फिरत असल्याचे गोपनिय माहिती वरून राजुरा पोलीसांनी सापळा रचुन सदर इसमांचा शोध घेवुन त्याचे कडील वाहनाची तपासणी केली असता सदर मोटार सायकल पोलीस स्टेशन राजुरा येथील अपराध क्रमांक २६५/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता या गुन्हयातील चोरीची असल्याचे आरोपी नामे (१) अक्षय चंद्रशेखर ताजने वय २३ वर्ष, (२) अजय विष्णु कुशवा वय २३ वर्ष दोन्ही रा. राजुरा यांना अटक करुन त्यांचेकडे गुन्हयासंबंधाने सखोल चौकशी केली असता त्यांनी बल्लारपूर व वरोरा येथील त्यांच्या साथीदाराचे मदतीने वेगवेगळया ठिकाणातून वाहने चोरी केल्याचे सांगितले वरून सदर आरोपी कडुन एकुण ४ मोटार सायकल बिना नंबर प्लेटची ज्यात एक बुलेट, दोन हिरो स्पेल्न्डर, एक पॅशन वाहन असा एकुण ३,७०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सुमीत परतेकी यांचे नेतृत्वात पोउपनि श्री पांडुरंग हाके, श्री भिष्मराज सोरते, पोलीस अंमलदार विक्की निर्वाण, अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, शरद राठोड, आनंद मोरे सर्व पोलीस स्टेशन राजुरा यांनी केली आहे.