एक पोलिस अधिकारी व तीन पोलिस अंमलदार यांना पोलिस पदक जाहीर

भंडारा पोलिस दलातील एक पोलिस अधिकारी व तीन पोलिस अंमलदार यांना पोलिस पदक जाहीर

महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचा-यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक, आणि पोलीस शौर्य पदकासह पोलिस महासंचालकाचे बोधचिन्ह, समानचिन्ह आणि प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात येते.

त्याअनुषंगाने २०२३ या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकाचे पदक (समानचिन्ह) जाहीर झाले आहे. यामध्ये भंडारा पोलीस दलातील एक पोलिस अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झालेल्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत घरडे अपर पोलिस अधीक्षक वाचक भंडारा, सहापोउपनि श्री. सुरेश उपाध्याय, पोलिस हवालदार श्री. दिनू मते पोलिस अधीक्षक वाचक भंडारा, पोलिस हवालदार राजेश बांते श्वान पथक भंडारा यांचा समावेश आहे.

या सर्वानी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त पोलीस मुख्यालय येथे पथसंचालनावेळी या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मा. श्री. योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा, मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. लोहित मतानी, व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, यांचे उपस्थितीत व मा. श्री. योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा हस्ते पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले आहे.