महाशिवरात्री निमित्त मार्कडा देव येथे यात्रेदरम्यान  बालकांनकरिता मदत केंद्र 

महाशिवरात्री निमित्त मार्कडा देव येथे यात्रेदरम्यान

 बालकांनकरिता मदत केंद्र 

 

गडचिरोली, .01: पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व चाईल्ड लाईन 1098 गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त मार्कडा देव येथे यात्रेदरम्यान बालकांनकरिता मदत केंद्र सुरु करण्यात आले. त्यामधे आज 0 ते 18 वयोगटातील हरवलेले व सापडलेले एकूण 47 बालकांना त्यांच्या पालकांना किंवा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच बालसंरक्षण विषय जनजागृती करण्यात आली. सदर कार्य जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे, तनोज ढवगाये, लेखापाल पूजा धमाले, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, निलेश देशमुख, चाईल्ड लाईन प्रकल्प समन्वयक छत्रपाल भोयर, टीम मेंबर अविनाश राऊत, देवंद्र मेश्राम, मयुरी रकतसिंगे, भारती जवादे उपस्थित होते.