कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे सीमावाद पेटला-हेमंत पाटील …

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे सीमावाद पेटला-हेमंत पाटील …

अमित शहांची शिष्टाई कामाला येणार;मुख्यमंत्र्यांनी समोपचाराने घ्यावे…

मुंबई, १६ डिसेंबर २०२२

केवळ राजकारणामुळे महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद तापवला जातोय.भाषेच्या मुद्दयावरून दोन्ही राज्यातील नारिकांच्या भावना भडकावत त्याचा राजकीय फायदा करून घेण्याचा मानस काही राजकीय पक्षांचा आहे.हे लक्षात येताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावादात शिष्टाई करीत दोन्ही राज्यांना, या राज्यातील विरोधी पक्षांना शांतता राखत घटनात्मक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. असे असतानांही गुरूवारी बेळगाव येथे काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली.अशात हा मुद्दा पेटवणारे खरे आरोपी कोण? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे,असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

 

कर्नाटक राज्यात २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.अशात येथील राजकीय पक्षांना महाराष्ट्रासोबतचा वाद पेटवून एकमेकांवर कुरघोडी करायची आहे.याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांमध्ये सीमावर्ती भागात अशांतता पसरवण्यात आली होती.मराठी भाषिकांचा कर्नाटकने छळ मांडला आहे हे खरं आहे. मराठी शाळांवरील फलके हटवून त्यांनी स्थानिकांचा भाषा स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला आहे. पंरतु, हे सर्व प्रकार आता थांबणे आवश्यक असून असे प्रकार घडवून आणणाऱ्यांची खरी ओळख पटण्याची आवश्यकता आहे, असे पाटील म्हणाले.

 

लोकशाहीत हिंसा, रक्तपाताच्या राजकारणाला मूळीच स्थान नाही. पंरतु, काहींकडूने हे ठरवून केले जात असेल तर अशांना शिक्षा झालीच पाहिजे.सीमावाद पेटवणारा ‘मास्टर माईंड’ समोर आला पाहिजे,असे पाटील म्हणाले. यासंदर्भात लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन ते सादर करतील. न्यायप्रविष्ट असलेल्या विषयात केंद्र सरकारने अशाप्रकारचा हिंसाचार खपवून घेवू नये,असे आवाहन पाटील यांनी केले असून सर्वोच्च न्यायालयात सीमावादासंबंधी याचिका दाखल करण्यासंबंधी संघटनेकडून विचारमंथन सुरू असल्याचे देखील ते म्हणाले.