Chandrapur l सिंदेवाही : लाडबोरी गावालगत बिबट्याच्या हल्लात शेळी ठार.

0

सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात दिनांक २४/१२/२०२० च्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गावालगत शेळ्या चराई करत असताना दबा धरून असलेल्या बिबट्याने गाबन शेळी वर हल्ला करून ठार तिला ठार मारले.

मृत शेळी पंचशिला चहांदे ह्या महिलाची आहे. यामध्ये जवळ जवळ १० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची शेळी मालकाचा म्हणने आहे. संबधित घटनेची माहिती सिंदेवाही येथील वन कर्मचारी यांना दिली वनरक्षक बडवाई यांनी घटनास्थळी भेट दिली. घटना स्थळी कॅमेरा लावले आहेत. वनविभाग प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे .

शासनाकडून पंचशिला चहांदे हि महीला गरीब व विधवा असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे जास्तित जास्त आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेळी मालकाची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here