पोलीस स्टेशन सिंदेवाही चे पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न.

0
  • पोलीस स्टेशन सिंदेवाही चे पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न

सिंदेवाही पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी नुकतेच कारभार हाती घेऊन शहरातील व तालुक्यातील समस्याचा विचार विनिमय व मार्गदर्शन करण्यासाठी आज सकाळी सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक ठेवण्यात आली होती.

बैठकीमध्ये अवैद्य व्यवसाय,चोरी,रस्ते वाहतूक, अपघात व ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल सविस्तर चर्चा करून उपस्थितांची विचार ऐकून त्यावर समाधान करण्याचे काम पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी केलेत.
तसेच शांतता सुव्यवस्था राखण्याकरिता शांतता समितीचे सदस्य तथा पोलीस मित्र त्यांची एक मुख्य भूमिका असल्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी कायद्याच्या नियमात राहुन पाळावे व सहकार्य करावे अशी सुचेना देत उपस्थितांचे आभार मानत बैठक पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here