अमृत योजनेसंबंधी मनपाची तक्रार निवारण शिबीरे २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत १४ शिबीरांचे आयोजन

अमृत योजनेसंबंधी मनपाची तक्रार निवारण शिबीरे

२८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत १४ शिबीरांचे आयोजन

 

चंद्रपूर २७ नोव्हेंबर – अमृत पाणीपुरवठा योजनेसंबंधी नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ११ या वेळेत विविध ठिकाणी १४ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे

केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरात पाणी पुरवठ्याचे काम सुरु असुन याबाबत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे तसेच योग्य ती कारवाई करण्यास मनपातर्फे ७ तक्रार निवारण पथके गठीत करण्यात आली आहे.

या पथकांद्वारे अमृत योजनेत नागरीकांना येणाऱ्या अडचणींची नोंद करून सोडविल्या जाणार आहेत तसेच उर्वरित तक्रारी पाणीपुरवठा विभागास सादर केल्या जाणार आहे. अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी झोन बनविण्यात आले आहेत. प्रत्येक झोन अंतर्गत शिबीर घेण्यात येणार असुन नागरीकांनी या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.