पशुसंवर्धन विभागातील योजनांसाठी आता ऑलनाईन अर्ज प्रणाली

पशुसंवर्धन विभागातील योजनांसाठी आता ऑलनाईन अर्ज प्रणाली

 

चंद्रपूर, दि. 25 : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी 2021-22 या वर्षापासून संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांने एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये म्हणून प्रतिक्षायादी पुढील पाच वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांला योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.

 

ऑनलाईन अर्ज केलेल्या पशुपालकांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल याची माहिती होवून लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीसाठी नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

 

सन 2022-23 या चालु वर्षाकरिता दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पासून शासनाच्या http://ah.mahabms.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यास सुरूवात झाली आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवरील अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे AH-MAHABMS यावरून देखील अर्ज करता येणार आहे. याबाबत अधिक माहिती टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ यावर उपलब्धआहे. पशुपालकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर यांनी केले आहे.