1 डिसेंबरला अजयपूर येथे ज्येष्ठ नागरिकांसांठी आरोग्य तपासणी शिबीर

1 डिसेंबरला अजयपूर येथे ज्येष्ठ नागरिकांसांठी आरोग्य तपासणी शिबीर

 

चंद्रपूर, दि. 25 : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीकरिता समाजकल्याण विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने 1 डिसेंबर रोजी चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर ग्रामपंचायत येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात नेत्रचिकित्सा, सामान्य आजार, अस्थीरोग तपासणी साठी तज्ञ डॉक्टरांची चमू उपस्थित राहणार असून बी.पी., शुगर, हिमोग्लोबीन यासह इतर तपासण्या व मोफत औषधीचे वितरण करण्यात येणार आहे.

तरी शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.