बाबुपेठ उड्डाण पुलाच्या कामाने पाईप लाईन क्षतिग्रस्त

बाबुपेठ उड्डाण पुलाच्या कामाने पाईप लाईन क्षतिग्रस्त

चंद्रपूर १५ नोव्हेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बाबुपेठ परिसरातील बाबा नगर व गौरी तलाव या भागामध्ये अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा करण्याकरीता

पाईप लाईन व नळ जोडणीची कामे करण्यात आली आहेत. कामानुसार पाईप लाईन चाचणीही सुरु करण्यात आली होती. मात्र बाबुपेठ येथील उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने या कामादरम्यान मनपातर्फे टाकण्यात आलेली पाईप लाईन क्षतिग्रस्त झालेली आहे.

सदर पाईप लाईन दुरुस्त करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच महात्मा फुले चौक ते बायपास रोड पर्यंत रस्त्याच्या व नालीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात पाईप लाईन व नळ जोडणी क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. त्यामुळे गौरी तलाव व बाबानगर या परीसरातील पाणीपुरवठा सुरु करण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी सुद्धा सदर भागातील पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याबाबत आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. शक्य तितक्या लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे.