मनपाच्या वतीने मुस्लीम समुदायासाठी लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर

मनपाच्या वतीने मुस्लीम समुदायासाठी लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर

चंद्रपूर, ता. २९ : शहर महानगरपालिकेद्वारे तुकूम तलाव भागातील शहरी प्राथमिक केंद्र क्र. ७ येथे दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी खास मुस्लीम समुदायासाठी लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सादर शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सुरेश पचारे, नगरसेवक सोपान वायकर, नगरसेविका शीतल गुरनुले आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या हस्ते करण्यात आले.

आरोग्य तपासणीकरिता बालरोगतज्ञ डॉ. प्रफुल्ल भास्करवार, डॉ. अर्वा लाहेरी, स्त्रीरोगतज्ञ डॉ. नसरीन मावानी, डॉ. मनीषा घाटे, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. नयना उत्तरवार यांच्याद्वारे करण्यात आली. तर सामान्य तपासणी डॉ. देवयानी भुते आणि डॉ. अतुल चटकी यांनी केले. त्याचप्रमाणे डॉ. नसरीन मावाणी यांनी उपस्थित नागरिक आणि महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना कोविड लसीकरणाबाबत संबोधित केले. यावेळी समुदाय संघटक सुषमा कर्मनकर देखील उपस्थित होत्या. सदर शिबिरात जवळपास ११० लोकांचे लसीकरण झाले.

तसेच भिवापूर येथील शाल्वान बुद्ध विहार येथे लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. सोनाली कपूर यांच्या हस्ते झाले. आरोग्य तपासणीसाठी डॉ. दिपाली वाघ, डॉ. विजया खेरा, डॉ. सोनाली कपूर यांचे सहकार्य लाभले. क्षयरोग विभागाच्या प्रतिनिधी स्वाती चौहान देखील उपस्थित होत्या. या शिबिरात एकूण 48 लोकांचे लसीकरण झाले