नागपुर समाचार : कोराडी मंदिर परिसरातील भिक्षेकर्‍यांना मिळाली “मायेची उब”

0

नागपूर समाचार : नागपूर सिटिझन्स फोरमतर्फे समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना थंडीचे कपडे, स्वेटर व ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत जवळपास 200 कुटुंबांची मदत करण्यात आली आहे. यात फुटपाथवर रहाणारे विक्रेते, झोपडपट्टीतील नागरीक, मांग गारुडी समाजातील विद्यार्थी, विधवा व निराधार महिलांचा समावेश आहे.

रविवारी महालक्ष्मी मंदिर कोराडी येथील भिक्षेकर्‍यांना थंडीचे कपडे व ब्लॅंकेट वितरीत करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानंतर भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी वाढली आहे. या मंदिरात येणार्‍या भाविकांवर आश्रित असलेले भिकारी मोठ्या आशेने येथे येणार्‍या भक्तांकडे पदर पसरतात. त्यांची हीच गरज ओळखून फोरमने कोराडी मंदिर परिसरातील भिक्षेकर्‍यांना थंडीचे कपडे वितरीत केले. यावेळी या अभियानाचे प्रमुख प्रतिक बैरागी, यांच्यासह अभिजित सिंह चंदेल, गजेंद्र सिंह लोहिया, अभिजित झा, विकास चेडगे, अमित बांदूरकर, वैभव पाटील व अमृता अदावडे आदी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here