आधारभूत धान खरेदी केंद्रावरील सावळागोंधळ व शेतकऱ्यांची लूट थांबवा- किशोर तरोणे.

0

आधारभूत धान खरेदी केंद्रावरील सावळागोंधळ व शेतकऱ्यांची लूट थांबवा- किशोर तरोणे.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.17 नोव्हेंबर:-
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आधारभूत धान खरेदी गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन द्वारे केंद्र हे तालुका शेतकरी खरेदी विक्री समिती अर्जूनी मोरगाव ही संस्था चालवीत आहे. महागाव अंतर्गत बोरी व खोडदा महागाव केंद्रावर शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. सदर संस्थाही धान खरेदी केंद्र व्यवस्थित हाताळत नाही अशी तक्रार माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी गोंदिया व अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2020-21 मध्ये शेतकऱ्या कडून गोडाऊन भाडे म्हणून प्रति क्विंटल दोन किलो धान अतिरिक्त घेण्यात आले आहेत, हमाली च्या नावावर प्रति शेतकऱ्यांकडून धानाचा प्रती कट्टा सात रुपये वसूल करण्यात येत आहेत, धानाचे मोजमापन झाल्यावर शेतकऱ्यांना त्यांचा बारदाना परत केला जात नाही. धान मोजणीसाठी शेतकऱ्यांनी आपले धान केंद्रावर आणले आहे. या केंद्रांवरून शेतकऱ्यांच्या धानाची चोरी होत आहे. याबाबत संस्थेकडे विचारणा केली असता, संस्थेने कुठलेही उत्तर दिले नाही. असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या धान खरेदी केंद्राची चौकशी करून, शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी किशोर तरोणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन सहायक जिल्हा पणन अधिकारी घोनाडे यांना आज दिनांक 17 नोव्हेंबर ला देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, हीरालाल शेंडे,व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here