भंडारा II राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन 31 ऑक्टोबरला

भंडारा ll राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन 31 ऑक्टोबरला

भंडारा, दि. 28 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र व जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनांचे सहकार्याने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

या दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, भंडारा पर्यंत करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिक, खेळाडू, विद्यार्थी व समस्त क्रीडा प्रेमींनी राष्ट्रीय एकता दौड मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.