विधीमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर

विधीमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण

समिती तीन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर

भंडारा, दि. 26 : महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती 28 ते 30 ऑक्टोबर 2021 रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. तीन दिवसाच्या या दौऱ्यात समिती विविध विभागाचा आढावा घेणार असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचारी पदभरती, पदोन्नती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी संदर्भात प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासी उपयोजना व बाह्यक्षेत्रात अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या योजनेच्या कामांना भेटी देणार आहेत.
 गुरुवार 28 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 ते 10 शासकीय विश्रामगृह भंडारा येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचेसोबत चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 अधिकाऱ्यांसोबत चर्चा, दुपारी 12 ते 12.30 पोलीस विभागाचा आढावा, दुपारी 12.30 ते 1.00 राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा, दुपारी 1 ते 1.30 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा आढावा, दुपारी 1.30 ते 2.00 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा आढावा, दुपारी 2 ते 3 राखीव, दुपारी 3 ते 3.30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आढावा, दुपारी 3.30 ते 5.30 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा आढावा. जिल्हा परिषद कार्यालयात सायंकाळी 5.30 ते 7.30 जिल्हा परिषद भंडारा कार्यालयाचा आढावा.
शुक्रवार 29 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान भंडारा जिल्ह्यातील आदिवासी उपयोजने अंतर्गत विविध विभागाने केलेल्या विकास कामांना तालुका निहाय भेटी व अधिकाऱ्यांसोबत चर्चा. शनिवार 30 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2.00 पर्यंत विविध विभागाचा आढावा व अधिकाऱ्यांसोबत चर्चा असा कार्यक्रम असणार आहे.