सोलापूर महानगर पालिकेत ‘बसपा’चा महापौर आरूढ होणार बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा दावा

सोलापूर महानगर पालिकेत ‘बसपाचा महापौर आरूढ होणार
बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा दावा

मुंबई१८ सप्टेंबर

सर्वसमावेशक,सर्वजन हितकारक विकासासाठी सोलापूर महानगर पालिकेत आगामी महापौर हा बहुजन समाज पार्टीचाच आरूढ होईल.फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेने पावन आणि पुरोगामी झालेल्या महाराष्ट्राला जातीचे नाही, तर ‘नीती’चे राज्य बनवण्याचे काम केवळ बसपाच करू शकते. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत यामुळे यंदा बसपाचे ४० नगरसेवक निवडून येती, असा दावा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी आज,शनिवारी केला. सोलापूर येथे आयोजित ‘संवाद यात्रे’च्या कार्यक्रमातून त्यांनी  उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. महाविकास आघाडीच्या काळात  होणाऱ्या भोंगळ कारभारावरही त्यांनी टिकास्त्र सोडले.

सोलापूर महानगर पालिकेत बसपाचे यापूर्वी ४ नगरसेवक निवडून आले होते.पंरतु,यावेळी उत्तम संघटन कौशल्य असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर महापालिकेत बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. वॉर्डनिहाय संघटनात्मक रचना कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले. राज्यात इतर मागासवर्गीय बांधवांचे हक्काचे राजकीय आरक्षण असो अथवा अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या बांधवांना देण्यात येणारे पदोन्नती आरक्षणाचा प्रश्न असो.महाविकास आघाडी सर्वच पातळीवर फोल ठरली आहे.जनतेचा राज्य सरकार विरोधात असलेला रोष संवाद यात्रेतून दिसून येत आहे.

अशात सर्वजनांसाठी बसपा एकमेव पर्याय आहे.सर्वांनी बहन मायावतीजींच्या नेतृत्वात बसपाच्या झेंड्याखाली एकत्रित आले, तर सर्व प्रश्न सुटतील,असा दावा देखील अँड.ताजने यांनी केला. आता पक्षाची ताकद सत्ताधार्यांना दाखवण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकांमधून ती ताकद सत्ताधार्यांना दिसेलच.पंरतु, समाज बांधवांच्या न्याय हक्काचा लढा बसपा लढणार आहे. ओबीसी, एससी, एसटीच्या आरक्षणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तरी बसपा मागे हटणार नाही, असा इशारा यावेळी अँड.ताजने यांनी दिला.

सोलापुर महानगर पालिकेअंतर्गत ‘सर्वजन सुखाय,सर्वजन हिताय’ या उद्दिष्ट प्राप्तीसाठी बसपा उत्तम पर्याय आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो अथवा शोषित, पीडित, उपेक्षितांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो, बसपा सत्तेत आली तर सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील, असे देखील अँड.संदीप ताजने म्हणाले. बसपाला त्यामुळे राज्यभरात जातीचे नाही, तर ‘नीती’चे लोक तयार करायचे आहे. आणि याच चांगल्या नितीच्या लोकांमुळे समाज परिर्वतन होण्याच्या दिशेने पाऊल टाकले जाईल, असे अँड.ताजने यावेळी म्हणाले.

कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे, जिल्हा प्रभारी अशोक अगवणे, बलभीम कांबळे, जिल्हा अध्यक्ष मिलिंद बनसोड, हुलगेश चलवादी, काळूराम चौधरी ,शहर अध्यक्ष देवा भाई उघडे, जिल्हा उपाध्यक्ष अँड.प्रेमनाथ सोनावणे, कोषाध्यक्ष विलास शेरखाने, सचिव योगेश गायकवाड, शहर सचिव मिझा शेख, प्रविण कांबळे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

जिसकी जितनी संख्या भारीउसकी उतनी भागेदारी‘-रैना
मा.कांशीराम साहेब यांनी ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागेदारी’ची घोषणा दिली होती.जातीनिहाय लोकसंख्येच्या आधारे प्रतिनिधित्व देण्याची बसपाची मागणी अगोदरपासूनच आहे. मा.बहन मायावती जी यांच्या नेतृत्वात याच दिशेने पार्टी कार्यरत आहे, असे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये तरूण, महिलांना योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. उत्तर प्रदेशात पाचव्यांदा बहन मायावती जींच्या नेतृत्वात बसपाची सत्ता येणार असल्याचा दावा रैना यांनी केला.