भारतीय कृषी विमा कंपनीच्या शेतकरी सुविधा केंद्राचे बसावराज मस्तोळी यांच्या हस्ते उद्घाटन

0

भारतीय कृषी विमा कंपनीच्या शेतकरी सुविधा केंद्राचे बसावराज मस्तोळी यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली, दि.25: गडचिरोली जिल्हा करिता पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली तालुका कंपनीच्या शेतकरी सुविधा कार्यालयाचे उद्धाटन बसावराज मस्तोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कु. शितल खोब्रागडे (तंत्र अधिकारी), श्रीमती मनिषा एन.ठेंगरे (कृषी पर्यवेक्षक), पिक विमा कंपनीचे जिल्हा समन्व्‍यक राकेश वायलालवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुका सवन्व्‍यक विशाल सपाटे, राहुल नंदनवार, हर्षद किरमिरे, शुभम दुधबळे आणि ऑपरेटर अविनाश वाघमारे व काही शेतकरी आदिंची उपस्थिती होती. सदर विमा कंपीनीच्या जिल्हा व तालुका कार्यालयाचे पत्ता पुढीलप्रमाणे आहे. तालुका गडचिरोली येथे c/o आनंद दुधे, दुधे कॉम्पलेक्स, संताजी नगर, गडचिरोली, कुरखेडा तालुक्यात c/o सचिन रतीराम वट्टी, श्रीरामनगर, तळेगाव रोड, कुरखेडा व तालुका चामोर्शी येथे c/o चंद्रशेखर शेरकी सादुबाबा नगर, मुल रोड, चामोर्शी असा पत्ता आहे असे जिल्हा समन्वयक, गडचिरोली यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here