सन 2022-23 मध्ये 45 लक्ष मनुष्यदिन निर्मीतीचे उद्दिष्ट – जिल्हाधिकारी, संजय मीणा

सन 2022-23 मध्ये 45 लक्ष मनुष्यदिन निर्मीतीचे उद्दिष्ट – जिल्हाधिकारी, संजय मीणा

गडचिरोली,दि.25: वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये 211731 नोंदणीकृत जॉबकार्ड धारक कुटुंबातील 217340 नोंदणीकृत मजुरांना जिल्हयास देण्यात आलेल्या 30.37 लक्ष मनुष्य दिवस उद्दिष्ट जिल्हयाकरीता देण्यात आलेले होते. तथापी, 4200737 लक्ष मनुष्यदिवस इतकी रोजगार निर्मीती झालेली असुन, मागील पाच वर्षातील उच्चतम कामगिरी आहे. त्याद्वारे मजुरांचे स्थलांतरावर नियंत्रण आलेले आहे. 9729.68 लक्ष रुपये इतकी मजुरीचे वाटप मजुरांच्या बँक व पोष्ट खात्यातुन करण्यात आले आहे. मनुष्यनिर्मीती दिवसापैकी 46.77 % हे अनुसूचित जमाती , 9.05 % हे अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे. एकुण मनुष्यदिन निर्मीतीपैकी महिलांकरीता 48.54 % मनुष्यदिन निर्मीती झालेली आहे. एकुण झालेल्या कामांपैकी 66.77% इतका खर्च कृषि व कृषि आधारीत कामावर करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अतिवृष्टिचे स्वरुप पाहता आगामी कालावधीत मग्रारोहयोवर मजुरांचे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे गृहित धरुन त्यानुसार वार्षीक नियोजन करण्यात आलेले आहे. अकुशल कामांना हातांना कामे देण्याबरोबरच कायम स्वरुपी मत्ता निर्मीतीचे देखील लक्ष ठेवण्यात ओलेले आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमीत्ता 75 अमृत सरोवर निर्मीतीचे उदिष्ट प्रत्येक जिल्हयास देलेले आहे. गडचिरोली जिल्हयाने 104 अमृत सरोवर पुनरुज्जिवनाचे उदिष्ट ठेवले आहे. त्यापैकी पुर्ण झालेल्या 25 अमृतसरोवराच्या किनाऱ्यावर 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण करण्यात आले. उर्वरित अमृत सरोवर 15 ऑगस्ट 2023 या दुसऱ्या टप्प्यात पुर्ण करण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंतर्गत जिल्हयामध्ये कृषि विभागामार्फत अद्याप पर्यंत 331.16 हेक्टरवर फळबाग लागवड घेण्यात आलेली आहे. अशी माहिती श्रीमती विजया जाधव, उपजिल्हाधिकारी, रोहयो यांनी दिली आहे.