मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना योजनेच्या लाभ घ्यावा

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना योजनेच्या लाभ घ्यावा

गडचिरोली, दि.17: मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना सन-२०२२-२३ अंतर्गत वैयक्तिक शेततळे

राबविण्याबत जिल्ह्यातील ८२% शेती कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे.विविध भागात पावसाचे होणारे अस्मान वितरण आणि पावसामध्ये येणारे मोठे खंड या प्रमुख अडचणी आहेत. अश्या कालवधीत सिंचन सुविधे अभावी पिकाच्या उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट येते अथवा पाण्याचा खुप जास्त ताण पडल्यास पिके देखील नष्ट होतात पर्यायाने शेतकऱ्यास आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर शेतावर शेततळ्यांसारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे. योजनेचे निकष : १) मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल रु.७५ हजार रकमेच्या मर्यादेत अनुदेय असलेल्या अनुदानाचा तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ठ-अ मध्ये नमूद करण्यात आला आहे. २) या योजनेंतर्गत शेततळे या घटकाची महा – डीबीटी प्रणालीद्वारे. online सोडतीद्वारे लाभार्थ्याची निवड करून शेततळे झाल्या नंतर अनुदेय असलेले अनुदान हे संबंधित शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाशी सलग्न बँक खात्यावर PFMS प्रणालीद्वारे वर्ग करणेत येईल.३) सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.२१६/२०२२/व्यय -१ दि. २९ जुन २०२२ अन्वये मिळालेल्या मान्यतेनुसार निर्गमितकरण्यात आलेले आहे. ४) सदर योजनेत शेतकऱ्यांना अर्ज करण्याची अंतिम तारीख- १८/०८/२०२२ ते १९/०९/२०२२ पर्यंत आहे. अधिक माहिती साठी कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे संपर्क साधावा असे . जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ब. भि. मास्तोळी यांनी आवाहन केलेलेआहे.