राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन

0

राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन

चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविणे अपेक्षित आहे. बचत गट आणि स्वस्त धान्य दुकानातून हे नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंचायत समिती, चंद्रपूर येथे राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.मिताली सेठी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील हर घर तिरंगा उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिका-यांनी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रध्वज प्रत्येक घरांमध्ये व्यवस्थित वेळेत पोहचविण्याकरीता नियोजन करण्याबाबत डॉ. मिताली सेठी यांनी सूचना केल्यात.

याप्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोहर वाकडे, जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, तालुका अभियान व्यवस्थापक शीतल देरकर, प्रतीक्षा खोब्रागडे , तालुका व्यवस्थापक जयश्री नागदेवते, सर्व प्रभाग समन्वयक आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा व्यवस्थापन कक्ष व पंचायत समिती व्यवस्थापन कक्ष यांच्या समन्वयातून प्रत्येक कुटुंबापर्यंत राष्ट्रध्वज पोहोचविण्याकरीता उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती स्तरावर राष्ट्रध्वज विक्री केंद्र उघडण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here