गडचिरोली | 1 ऑगस्ट्र रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

0

गडचिरोली | 1 ऑगस्ट्र रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

गडचिरोली,  दि.28 : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. या लोकशाही दिनानिमित्त नागरिक व शेतकरी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करतात.

सोमवार दिनांक 1 ऑगस्ट्र 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहित नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक जोडून ( प्रपत्र -1 अ ते 1 ड ) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल. तसेच तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. तसेच निवेदन स्वीकारण्याची वेळ सकाळी 2.00 ते 3.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा लोकशाही दिन गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here