सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले प्रशिक्षण शिबीर

सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले प्रशिक्षण शिबीर

चंद्रपूर २७ जुलै – नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स आणि डेव्हलपमेंट अंतर्गत कॅम फाउंडेशन पुणे मार्फत चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभागातील सफाई कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

केंद्र सरकारच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकची होणारी धोकादायक पध्दतीने माणसांकडून होणारी सफाई पूर्णपणे थांबवून त्याठिकाणी यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हे सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान राबविले जात आहे.

सदर कार्यशाळेत मलवाहिन्यांच्या साफसफाईमध्ये हस्तक्षेप न करता ती यांत्रिकी मशीनव्दारे करण्याच्या दृष्टीने, मलवाहिनी व मशीन होल यांच्या साफसफाईसाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणांची माहिती देण्यात आली. साफसफाई करताना सफाई मित्रांसाठी हेल्मेट, हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट, मास्क, युनिफॉर्म, फस्ट एड बॉक्स, गॅस मॉनिटर, ऑक्सिजन सिलेंडर, रिफेलेवटींग जॅकेट, टॉर्च अशा सुरक्षा साधन स्वरूपातील सेफ्टी किटची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले तसेच मलनि:स्सारण विषयक काम करणार्‍या सफाईकर्मींनी वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे सूचित करण्यात आले.

याप्रसंगी महानगरपालिका सफाई कर्मचारी उपस्थीत होते.