आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा

गडचिरोली, दि.26: सध्या मान्सुन कालावधी सुरु असुन गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मूसळधार पावसामुळे जलसंपदा विभागांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दिना प्रकल्प, गडचिरोली शहरातील गडचिरोली मा.मा. तलाव व इतर तालुक्यातील लघु तलाव असे जिल्ह्यातील एकूण 20 प्रकल्प 100 टक्के भरलेले असून काही लघु तलाव 90 टक्के पेक्षा जास्त भरलेले आहे.

प्रकल्प/ तलाव पाहण्याकरीता पर्यटक/स्थानिक नागरीक यांची ये-जा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकल्प 100 टक्के भरल्याने वेळोवेळी येणाऱ्या पावसामुळे सांडव्यावरुन विसर्ग कमी-जास्त प्रमाणात प्रवाहीत होत असतो. तेव्हा यासंदर्भात उचित सतर्कता बाळगण्याचे दृष्टीने प्रकल्पाच्या/तलावांच्या काठावरील नागरीकांनी तसेच पर्यटकांनी उचित सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी असे गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे.