गडचिरोली | 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन

0

गडचिरोली | 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन

गडचिरोली, दि.14: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली तर्फे दिनांक 15 जुलै 2022 रोजी ऑनलाईन दु.12.30 वाजता जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन कार्यक्रमात ड्राईव्हिंग क्षेत्रातील महिलांकरिता रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीबाबत चेतन पाटील, मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याकरिता दु.12.30 वाजता meet.google.com/fgb-kmnv-pit या लिंकवर जाईन करावे असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here