आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल 

आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल 

मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे  

चंद्रपूर ४ जुलै – डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्वेमध्ये ४७०० घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत. त्यामुळे आताच काळजी घेऊन आपले घर डेंग्युमुक्त ठेवण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहेत.

मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, एनएम व आशा वर्करद्वारा डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात आहे. सर्वे अंतर्गत आतापर्यंत ५४००० घरांची तपासणी करण्यात आली असुन यात ४७०० घरे दुषित आढळली आहेत. हे प्रमाणही मोठे असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

डेंग्युचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका. पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाका. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.

डेंगू हा जीवघेणा आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे डांस वाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे.डेंग्यु रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.