शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खताचा वापर करावा – रवींद्र भोसले Ø गुंथारा येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खताचा वापर करावा – रवींद्र भोसले Ø गुंथारा येथे कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

भंडारा दि. 29 : जमिनीत सूक्ष्म जीवांची वाढ करण्यासाठी आणि सूक्ष्मजीव जिवंत ठेवण्यासाठी शेतात हिरवळीचे खते यामध्ये त्यांच्या बरोबरच जैविक खतांचा वापर तसेच रायझोबियम, हिरवे, निळे शेवाळचा वापर वाढवून रासायनिक खतांवरील खर्च कमी करून उत्पादनात वाढ करावी, असे प्रतिपादन नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले.

भंडारा तालुक्यातील गुंथारा येथील बौद्ध विहार येथे आयोजित कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला पुणे येथील कृषी आयुक्तालयातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर, जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने, भंडाराचे उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, साकोली कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ भात पैदासकर डॉ. जी. आर. शामकुवर, भंडाराचे तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, कृषी विकास अधिकारी विश्वजीत पाडवी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पवार, योगेश मेहर, उपसरपंच मंजुषा जगनाडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

कृषी आयुक्तालयातील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर यांनी भातशेतीमध्ये युरिया ब्रिकेटचा वापर करून रासायनिक खताची बचत ही साधारण 30 टक्के होत असून उत्पादन खर्च कमी करण्याविषयी मार्गदर्शन केले.

उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासह फळबाग लागवड भाजीपाला लागवडीसाठी बदलते तंत्रज्ञान व कृषी यांत्रिकीकरण योजना विषयी व मिळणाऱ्या अनुदानाविषयी माहिती दिली.

डॉ. श्यामकुवर यांनी भात पिकातील उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान व श्री पद्धतीचा वापर व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन तसेच बीजप्रक्रिया विषयी मार्गदर्शन केले. संचालन आत्माचे सतीश वैरागडे यांनी केले. प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी केले. आभार भगवान कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी होमराज धांडे, गिरीश रणदिवे, सतीश वैरागडे, रिना घडले, मीनाक्षी लांडगे उमेद आणि महिला बचत गटातील सदस्य तसेच गावातील शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले.