स्पर्धा परीक्षा व मुलाखतीचे तंत्र या विषयावर 29 जून रोजी मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षा व मुलाखतीचे तंत्र या विषयावर 29 जून रोजी मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 21 जून : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने स्पर्धा परीक्षा व मुलाखतीचे तंत्र या विषयावर 29 जून 2022 रोजी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा (हॉल क्र. 5 व 6) येथे आयोजित या सत्रात राणाज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक इर्षाद शेख संबोधित करतील. तरी स्पर्धा परीक्षा व मुलाखतीची तयारी करणा-या जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी या सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.