माजी सैनिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

माजी सैनिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

भंडारा, दि. 20 : जिल्ह्यातील जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या व सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या माजी सैनिकांसाठी कामठी येथील सोधी ऑडिटोरियम स्टेशन हेडकॉटर येथे सीजिडीए पुणे यांच्याकडून बुधवार 22 जून 2022 रोजी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सेवानिवृत्त माजी सैनिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे