बियाणे, खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कंट्रोल रूमची स्थापना · कंट्रोल रूम क्रमांक ९८२३५४७८६१

बियाणे, खतांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कंट्रोल रूमची स्थापना

· कंट्रोल रूम क्रमांक ९८२३५४७८६१

 

भंडारा, दि. 18 मे : जिल्हयात येत्या खरीप हंगामात गुणवत्ता पुर्ण बियाणे, खते पुरवठा होण्यासाठी, या निविष्ठांचा काळाबाजार होण्यावर प्रतिबंधासाठी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी थेट कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष) मध्ये ९८२३५४७८६१ या क्रमांकावर तक्रार दाखल करावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या समस्यांचे नियंत्रण कक्षात निराकरण करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगिता माने यांनी केले आहे.

 

या कंट्रोल रूममध्ये कृषि विभाग व जिल्हा परीषद कृषि विभाग येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बियाणे, खते व किटकनाशके यांचे खरेदी करतेवेळेस शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात, अश्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आले आहे. या नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकींगबाबत असलेल्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. नियंत्रण कक्ष दिनांक 15 मे ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहील.

 

जादा दराने खताची विक्री होत असल्यास, बियाणे, खते खरेदीचे बिल मिळत नसल्यास शेतकन्यांनी ९८२३५४७८६१ या क्रमांकावर आपले नावासह व संपुर्ण पत्ता व तक्रारीच्या स्वरूपाची माहिती देवून तक्रार नोंदवावी, असे आवाहन संगिता माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.