जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतीमधील रिक्त जागेचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतीमधील रिक्त जागेचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर

 

भंडारा, : जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतीमधील निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकींचा कार्यक्रम निवडणुक आयोगाकडून प्राप्त झाला आहे.

 

भंडारा तालुक्यातील 8 ग्रामपंचायतमध्ये 13 रिक्त पदांची, पवनी तालुक्यातील 3 ग्रामपंचायतमध्ये 3 रिक्त पदांची, साकोली तालुक्यातील 4 ग्रामपंचायतमध्ये 4 रिक्त पदांची व लाखनी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतमध्ये 6 रिक्त पदांची पोटनिवडणुक होणार आहे.

 

तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 एप्रिल 2023 असेल, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा ‍दिनांक 25 एप्रिल ते 2 मे 2023 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करता येईल, नामनिर्देशन छाननी करण्याचा दिनांक 3 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासुन सुरू होईल, नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, निवडणुक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी दिनांक 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेनंतर प्रसिध्द करण्यात येईल. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 18 मे 2023 असेल, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याचा दिनांक 19 मे 2023 रोजी आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 24 मे 2023 आहे.

 

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका योग्य प्रकारे पार पाडण्याकरिता आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे उपजिल्हाधिकारी (महसुल) श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.